Tuesday, July 19, 2016

माझ पत्र

प्रिय स्त्री,

जन्म देताना आई तु होतीस..
भांडुन भांडुन भांडली जरी तरी माझी काम करणारी ताई तु होतीस..
माझी खोड काढणारी मावशी तु होतीस..
सगळ्यांन पासुन लपुनछपुन मला खाऊ साठी पैसे देणारी आजी तु होतीस..
वाईट वेळेस सोबत राहणारी मैत्रीण तु होतीस..
आयुषभर प्रेम करणारी बायको ही तु होशीलच
पण मला एक सांग ना?
'स्त्रि' तु येवढे पात्र निभावतीच कशी?
या ब्लॅक अण वाईट चित्रपटातला तु प्रतेक पात्रातुन कर्लफुल करतीच कशी?
तुझ नेहमी दुसर्यांसाठीच समर्पीत आयुषा चे चटके मला आता बसु लागलेत.. जेव्हा पासुन मी तुझ्या बाजुने विचार करू लागलोय..

एकाच वेळेस कीती सार्या भुमीका करतीस ग तु..

कुठ नऊ महिने लेकराला पोटात संभळतीस तु...
तर कुठे रोज च्या कामातुन खचलेल्या नवर्या ला सावरतीस तु..
जन्मा पासुन ते सासरी जाई पर्यंत आई-बांबाची सेवा करतीस तु..
सासरी गेलीस तरी त्या सासु-सासरांना आई-बाबां पेक्षाही जास्त माया लावतीस तु..
घरी असताना बहीन म्हणुन जिव लावताना दिसतीस तु..
तर बाहेर असलो की मैत्रीण म्हनुन कोणला तरी हसवताना दिसतीस तु..

येवढ सगळ करून सुधा कीती त्रास सहन करतीस तु..
काही ठिकांनी तर तुझ्या जन्मा आधीच तुला मारल जात..
जन्मला आलीस तरी सुधा तुझ्या स्वप्नांना ठेचल जात..
पुरूषाअर्थ सिध करण्या साठी काही हरामखोर तुझ्या आभरूशी खेळतात..
पावला पावला वर तुझा अपमान करतात..
काटा येतो अंगावर आईकुन तुझ्या आयुषाची कहाणी...
पण सुखवत मन पाहुन तुझ्या यशाची भरारी...

स्त्रि तुला एकच सांगन आहे..
आता तुझ्यातल्या जिजाऊ-सावीत्री ला पुन्हा एकदा जाग करण तुझ्याच हतात आहे..
तुझ्या आयुषा ची भरारी अशीच ठेव..तुझ्या यशाने त्यांना गप्प ठेव.!

हे पत्र तुला लिहतो
तुझाच मुलगा
तुझाच भाऊ
तुझाच नातु
तुझाच मित्र
तुझाच नवरा

हेच सांगण्यासाठी की सगळ्या पुरूषां सारखा मी नाही....
संपले जरी सगळे तरी तुझ्या कामाला सलाम करायला मी राहीन!

✒️..रोहीत जगताप

Saturday, January 23, 2016

'मेरी जिंदगी का मक्सद ...!'

दुसरो के लिय जिना हे जिंदगी का एक ही मक्सद मेरा..
हर एक के चेहरे पे मुस्कुराहत लाना काम हे मेरा...

क्या पता..कल किसने देखा हे..
कल हम हो या ना हो ये सिर्फ खुदा जांनता हे..

इसलीय एक पलकी हे ये जिंदगी यही मांनता हु मै..
उस पल को दुसरो के लिय जिना चाहता हु मै..

इंसानियत की इस दुनिया मे, ना जाने इंसानियत कहा खौ गई हे..
अब बस हो गया..! अब तो हर एक इंसान को इंसानियत सिखाना चाहता हु मै...

प्यारी सी इस दुनिया मे ना जाने प्यार किस किस के दिल मे चुप के बेठा हे...
अब हर एक के दिल मे चुपा हुवा प्यार ढूँढ़ना चाहता हु मै...

मेरे जिंदगी का मक्सद पुरा करना चाहता हु मै..
मेरे जिंदगी का मक्सद पुरा करना चाहता हु मै..

✒...रोहित जगताप

Saturday, November 14, 2015

'Common Man ची दिवाळी खरेदी'

लेखक:- रोहित जगताप पाटील

दिवाळी म्हणल की खरेदी आलीच.
दिवाळी चा सर्वात जास्त उत्साह मुलांन मधेच दिसुन येतो.. दिवाळीला नविन कपडे भेटणार याची उत्सुकता त्यांना येवढी असते की दिवाळी च्या एका आठवड्या पुरवीच आई-बाबांना कपडे घेण्याचे हट ते  करतात.. सर्वांची दिवाळी ही अशीच.

पण आमच्या भारतातल्या Common Man ची दिवाळी काही वेगळीच असते.. प्रामाणीक पणे काम/व्यवसाय करून मिलणार्या पगार आणी दिवाळीचा थोडाफार बोनस..या सगळ्यातुन दिवाळी ला आपल्या मुलांना कपडे,फटाके घेण्याची इच्छा खुप असते पण घेतलेल्या गाडी/घरांचे हफ्ते फेडण्यासाठी, बॅकेत थेवलेले बायकोचे दागीने सोडुन आण्यासाठी बोनस मधले पैसे वापरून कमीत कमी खरचात दिवाळी जावी अशी मनात एक वेगळीच अपेक्षा असते..

त्याची मुले कपडे घेण्याचा हट करत असतातच...करणारच कारण सामान्य माणसाच्या घरात नविन कपडे फक्त दिवाळीला आणी वाढदिवसालाच घेतली जातात..

म्हणुन वडिल आपल्या रविवारच्या सुट्टीत संध्याकाळच्या वेळेला बाजारात येतात.. सगळीकड रोशनाई,आकाश कंदील,दुकाना बाहेर लावेलेल्या नवीन कपडे,आणी बाजारात जमलेली सर्वसामान्य माणसांची गर्दी..
सर्वात पहीला विचार वडिल करातात तो म्हणजे 'कुठल्या दुकानात स्वस्त कपडे मिळतील?'..मग एखादा ओळखीचा दुकांनदारच्या दुकानात जातात, दुकांनदाराला सर्वात पहीला शब्द 'भाई जरा अपणे बजेत के हिसाब से बताना'
मुलांन मधला उत्साह आजुन वाढतो...एखादी Pant मुलाला पंसत होते..तो वडिलांना सांगतोच... की वडिल पहील Pant ची किंमत बगतात..महाग वाटते... आणी मग मुलाला समजुत घालण्यासाठी 'बाळा ती मोठी आहे तुला नाय बसणार आणी असली कपडे लगीच खराब होतात' वगैरे वगैरे कारण सांगुन अखेर स्वस्तातली कपडे घेऊन परिवार दुकाना मधुन घरी जायला निगतो..
बाजारात पाणी-पुरी,आईसक्रीम च्या गाड्या पाहुन मुलांन कडुन पुन्हा एकदा पाणी-पुरी,आईसक्रीम खाण्याचा हट सुरू होतो..काही वेळेस वडिल जानुन-बजुन दुसर्या मार्ग वरून जातात ज्या मार्गात पाणी-पुरी च्या गाड्या नसतात..मुलांची इच्छा मारण्याचा त्यांच हेतु आजीबातच नसतो पण परिसतिथी अस करायला भाग पाडते...
अशी दिवाळीची खरेदी पार पडते..

दर वर्षी हेच होत पण काही वर्षांनी जेव्हा हीच हट करणारी मुल मोठी होतात आणी त्यांना त्यांच्या परिसतिथी ची जानीव होते..तेव्हा दिवाळी च्या एक अठवड्या पुरवी हट करणारी मुल वडील म्हणत नाय तोपर्यत कपडे घ्याची म्हणुन शब्द ही काढत नाय..शेवटी वडील पुन्हा एकदा बाजारात खरेदी करायला येतात..
पुन्हा तोच दुकांनदार आणी दुकांदाराला तेच पहिले शब्द..अर्थात दुकांनदाराला आता ठाऊक झाले असते की ह्यांना किती किंमती ची कपडे दाखवायची..
कपडे चे रेट उंचावले असतात म्हणुन ठोडी माघातली कपडे तो दाखवतो..ह्यावेळेस वडिल नाही मुलच किंमत पाहतात..कपडे आवडलेली तर असतात पण परिसतिथि लक्षात घेत आता मोठी झालेली मुल  "बाबा ह्यावेळेस चांगली कपडे नाहीत बाजारत आपण नको घ्याला..येऊ नंतर केव्हा तरी" अस म्हणुन कपडे खरदी चा कार्यक्रम रध करतात...
आणी नेहमी प्रमाणाने आपल्या मुलांची हाऊस पुर्ण न करू शकल्याच दुख ठेऊन तो मनातल्या मनात रदत असतो..त्याच काळजाच पाणी पाणी होत असत..

ह्या वेळेस पाणी-पुरी च्या गाडी कड बगुन तोंडाला सुटेलेल पाण्या कड दुर्लक्ष करत मुल घरी निघुन येतात..केव्हा केव्हा तर पाणी-पुरी च्या गाडी समोरच्या रस्तयाला गर्दी असते सांगुन मुलच वडिलांना दुसर्या मार्गा वरून जाण्यास सांगतात..

शेवटी दर वर्षी प्रमाणे तोच Common Man रात्री झोपताना आपल्या आश्रुंनी डोक्या खालची उशी ओली करत असतो..

येवढ सगळ होऊन सुधा आपल काम/व्यवसाय प्रामाणीक पणे करत दुखांवर हांतरून घालुन सुखी आयुष जगण्याचा तो पर्यंत करतच असतो..
त्याला माझा लाख लाख सलाम..!

©rohitjagtap10rj@gmail.com

Friday, September 18, 2015

" चला ना दोस्तांनो मजा करू"


चला ना दोस्तांनो मजा करू..
काही काळ एकमेकांन साठी काढू...

हव असल्यास Clg,Class ला  Bunk ही मारू..
चला ना दोस्तांनो मजा करू..

बघा ना बाहेर... वातावरण ह्या पावसाच..
ह्याच पावसात चिंब भिजु, एक एक चहा ची कटिंग मारू..
चला ना दोस्तांनो मजा करू..

हव असल्यास Bill ही मी देतो..
चहा बरोबर एक एक भज्जी प्लेट ही घेतो..
पण चला ना दोस्तांनो मजा करू..

भेट ही आपली होईल, आठवणींना पुन्हा एकदा उजाला येईल..
शाळेतल्या कट्या वरची गोष्टी पुन्हा एकदा शेयर करू..
चला ना दोस्तांनो मजा करू..

हातात हात धरून गाऊ गीत मैत्रीचे..
आणी भरपुर सारे Selfies ही काढू.
चला ना दोस्तांनो मजा करू..

Whatsapp वरचा नावा पुरताचा ग्रुप आता मात्र लेफ्ट करू..
आणी दोस्ती चा खरा ग्रुप पुन्हा एकदा Join करू..
चला ना दोस्तांनो मजा करू..

एकमेकांची टिंगल ही करू.. आणी छोट छोट्या जोक्स वर मोठ मोठ्याने हासू..
चला ना दोस्तांनो मजा करू..

आता टाळाटाळी ही नका करू,
'नाय जमणार Buzy आहे'
हे कारण आता तरी नका सांगु..
भेटु आज आणी पुढच्या भेटीचे Plan ही बनवू..
चला ना दोस्तांनो मजा करू..
चला ना दोस्तांनो मजा करू..

...रोहित जगताप

ती मैत्रीण असते..

प्रतेकाच्या आयुषात एक मैत्रीण असते..

आपल्याला आवडणार्या पोरीशी setting लाऊन देणारी.. ती मैत्रीण असते..

आपल्या प्रतेक गोष्टी फक्त तिच्या बरोबरच शेयर करावेशे वाटणारी.. ती मैत्रीण असते..

आपल्या Off झालेला मुड कसा मसकरी करून ठीक करायचा हे फक्त तिलाच माहीत असते... तीच मैत्रीण असते..

आपली काळजी करणारी पण आपल तिला काहीच पडल नाही अस दाखवणारी...ती मैत्रीण असते..

भाऊ,भाऊ करून प्रतेक गोष्टी वर आपल्या कडून गिफ्त मागणारी एकच असते... तीच मैत्रीण असते..

तीच चुकल तरी साॅरी आपणच म्हणायच कारण एवढी जिवाभावाची मैत्रीण कोणाला नकोशी वाटणारी असते...?
तीच मैत्रीण असते...

अर्थात मोठ्या बहीणी सारखीच ती एक असते..
प्रतेकाच्या आयुषात ही मैत्रीण नक्कीच असते.

..रोहीत जगताप

Thursday, June 11, 2015

"बहुजनांनो शिकाल तरच टिकाल"

"विद्येविना मती गेली,
मतीविना नीति गेली"
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले.
वित्ताविना शुद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले..!!!
          ----महात्मा फुले

बहुजनांनो शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा...!!
          -डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

बहुजनांनो आपल्या महापुरषांनी सांगीतल्या प्रमाणे आपल्या आयुष्यात शिक्षण हे फार म्हत्वाच.
आपले पुर्वज शिकले नाही, म्हणुन त्यांच्या वर धर्माच्या नावाने हुकूमशाही करण्यात आली,
बहुजन समाज गुलामगिरीत जगत असल्याच एकच कारण ते म्हणजे अडाणीपणा,
न शिकल्याचा परिणाम.

आज ही आमचा समाजाला तुम्ही किती ही शिक्षित म्हणत असला तरी सुध्दा अजुन अडाणीपणातच वागतो,
आमचा समाज. गुलामगिरीतुन बाहेर पडायलाच नाही म्हणतोय, पण काही प्रमाणात आमच्या लोकांन मधे बदल झालाय.
वाईट व्यवसतेला लाथा मारल्यात त्यांनी पण काही प्रमाणात नाही, परिवर्तन हे पुर्ण समाजाच झाल पाहीजे.
आमच्या बहुजन समाजात शिकुन मोठ्या मोठ्या पदावर गेलेले अनेक आहेत पण शिकुन डिग्री घेऊन काय फायदा जर एखादा
Doctor,Engineer,
Bussinessman,Collector, ईत्या..जर आपल्या हाय-फाय Audi- Mercedes ला 'लिंबू-मिरची' लावलत असल,
जर तो त्याच्या कष्टाने बांधलेल्या बंगल्या वर सत्यनारायणा सारखे लुटारू विधी करत असल,
घराचा दरवाजा कुठल्या दिशेला असावा हे एका भटजी ला विचरत असाल,
कुठल ही काम मुहुर्त पाहुन करत असाल,
आपल्या पोरांच शांती साठी नागबळी-पुजा विधी करत असाल,आणी आजुन बरच काही
फालतू गोष्टी करत असाल तर फायदा काय शिक्षण घेऊन... डिग्र्या घेऊन.????

आजच्या स्पर्धेच्या युगात जर टिकायच असेल,उद्या चा देश हा खरच पुरोगामी बनवायचा असेल तर मित्रांनो शिक्षण फार म्हतवाच आहे.
"शिक्षण हे वाघीणीच दुध आहे, जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही"
अस बाबासाहेब सांगुन गेले..
आपल्याला ते दुध प्यावच लागेल.. जर टिकायच असल तर शिकलच पाहिजे.

ज्या शंभुराजेंनी शिवरायांच्या स्वराज्य आपल्या खांद्यावर उचलून आपल्या पराक्रमाने शत्रुंना सुधा वेड लावल त्या शंभुराजेंनी आपल्या 32 वर्षाच्या आयुष्यात 'बुधभुषणम' हा संस्कृत ग्रंथ तर 'नायिकाभेद','साततशतक', 'नखशिख' हे ब्रज भाषेत ग्रंथ लिहले.
ज्या काळात Google न्हवते Facebook,email,Gmail,Twitter न्हवते.. अहो शाळा ही नव्हत्या त्या वेळेस हे ग्रंथ संस्कृत पंडित शिवपुत्र शंभुराजेंनी लिहल...!!

एक साध्या मछीमार्याच्या घरी जन्मलेला पोरगा..आपल्या शिक्षणा साठी बहीणे चे दागिणे ज्यांला घाण टाकावे लागले.. तोच शिकुण येवढा मोठा माणुस झाला की आज संपुर्ण जग त्यांना 'Missile Man' म्हणुन ओळखत, अशे Dr.APJ Abdul Kalam.

भारतात Super Computer बनुन देणारे एका साध्या शेतकराचं पोर 'विजय भाटकर'

महाराष्ट्राचे जेष्ठ नेते 'डाॅ. श्रीकांत जिचकार' ह्यांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर अनेक पदव्या मिळवल्या आणी त्यांची "The most qualified person in India" म्हणुन Limca Book Of Records मधे नोंद आहे. (अधिक माहीती साठी Google चा वापर करावा)

अशे आजुन कितेक आदर्श आपल्या  समोर आसतील.. त्यांचाच आर्दश घेऊन आपण देखील अभ्यासाला लागल पाहीजे.
जो क्षेत्र निवडताल त्या क्षेत्रातला बाप बना.

'ज्या दिवशी बहुजन समाजातला प्रतेक युवक हा उच्च शिक्षीत होईल त्या दिवशीच बहुजन समाज गुलामगिरीतुन मुक्त होईल'

जय जिजाऊ
जय शिवराय
जयस्तु मराठा

✒..रोहीत जगताप पाटील
rohitjagtap10rj@gmail.com

Sunday, January 25, 2015

समाज बदलतोय युवक घडतोय


एक काळ आसा होता ज्या वेळेस आम्हाला छत्रपती शिवराय म्हंटल तर आठवत होता फक्त चौथी च्या पाठ्य पुस्तकातला ब्राम्हणी अण खोठा इतिहास..
(उदा: दादोजी कोंडेव शिवरायांचे गुरू अस सांगने,शिवरायांना तलवार आई भवानी नी स्वता प्रकट होऊन देने. ईत्या...)
कारण आमच्या पोरांनी कधी त्या पलीकड जाऊन शिवराय समजून घेतलेच नाही.. शिवरायांनच खर शिवचरीत्र कधी वाचूशी वाटल नाही.
आता पर्यंत आम्ही शिवराय हे नाव आईकल होत पण कधी मस्तकात उतरवलच न्हवत.. आम्हाला शिवराय आठवायचे ते फक्त धर्म आणी जातीय दंगली मधे...

पण आता हे बदलय थोड्या प्रमाणात का होईना आमची तरूण पिढी जागी झाली आहे ... आता आमची पोर फक्त खरा इतिहास शोधतच नाय तर तो लिहण्याचा पण पर्यंत करत आहे... आण तो इतिहास लिहता लिहता एक नवीण इतिहास घडवत आहे..
आपल शिक्षण पुर्ण करता करता अनेक सामाजीक कामात,चळवळीत भाग घेत आहेत..
आमल्या धर्मा पेक्षा आमला समाज म्हतवाचा वाटायला लागलाय त्यांना... समजासाठी काही तरी करण्यांची ईच्छा आज त्यांना होत आहे... उच्च शिक्षण घेऊन उच्च अधिकारी पद घेऊन आपल्या समाजाला आर्थिक परस्थीतीत मदत करण्याची उर्जा त्यांनच्यात येऊ लागली..
"शिवराय" हा एक अभ्यासाचा विषय झालाय त्यांनच्या साठी..
शिवरायांनच अर्थश्रास्त्र,
शिवरायांनच जलधोरण,
शिवरायांनच निसर्ग प्रेम,
शिवरायांनच महिला धोरण,
शिवरायांनच समाज प्रेम,
शिवरायांनच मातापिता प्रेम,
शिवरायांनचा इतिहास,
या सगळ्या गोष्टीतून ते आता शिकू लागलेत..
उद्या च्या उजवल महाराष्ट्रा साठी आजची तरूण पिढी राजकारणात, राजकारण करण्या साठी नाही तर राजकारण बदलन्या साठी जात आहे..
आपल्या समाजाला एकत्र बाधन्याच काम करत आहे.. महामानवांच्या विचारांनी माणुसकी जप्त आज जगात आपल्या देशाला सर्वच्च स्थान मिळवण्या साठी आपल्या परिणे पुर्ण प्रर्यंत करत आहे आज ची ही तरूण पिढी..
आणी ह्याच तरूण पिढीचा मी एक भाग असल्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो... 

©..रोहित जगताप®
rohitjagtap10rj@gmail.com