लेखक:- रोहित जगताप पाटील
दिवाळी म्हणल की खरेदी आलीच.
दिवाळी चा सर्वात जास्त उत्साह मुलांन मधेच दिसुन येतो.. दिवाळीला नविन कपडे भेटणार याची उत्सुकता त्यांना येवढी असते की दिवाळी च्या एका आठवड्या पुरवीच आई-बाबांना कपडे घेण्याचे हट ते करतात.. सर्वांची दिवाळी ही अशीच.
पण आमच्या भारतातल्या Common Man ची दिवाळी काही वेगळीच असते.. प्रामाणीक पणे काम/व्यवसाय करून मिलणार्या पगार आणी दिवाळीचा थोडाफार बोनस..या सगळ्यातुन दिवाळी ला आपल्या मुलांना कपडे,फटाके घेण्याची इच्छा खुप असते पण घेतलेल्या गाडी/घरांचे हफ्ते फेडण्यासाठी, बॅकेत थेवलेले बायकोचे दागीने सोडुन आण्यासाठी बोनस मधले पैसे वापरून कमीत कमी खरचात दिवाळी जावी अशी मनात एक वेगळीच अपेक्षा असते..
त्याची मुले कपडे घेण्याचा हट करत असतातच...करणारच कारण सामान्य माणसाच्या घरात नविन कपडे फक्त दिवाळीला आणी वाढदिवसालाच घेतली जातात..
म्हणुन वडिल आपल्या रविवारच्या सुट्टीत संध्याकाळच्या वेळेला बाजारात येतात.. सगळीकड रोशनाई,आकाश कंदील,दुकाना बाहेर लावेलेल्या नवीन कपडे,आणी बाजारात जमलेली सर्वसामान्य माणसांची गर्दी..
सर्वात पहीला विचार वडिल करातात तो म्हणजे 'कुठल्या दुकानात स्वस्त कपडे मिळतील?'..मग एखादा ओळखीचा दुकांनदारच्या दुकानात जातात, दुकांनदाराला सर्वात पहीला शब्द 'भाई जरा अपणे बजेत के हिसाब से बताना'
मुलांन मधला उत्साह आजुन वाढतो...एखादी Pant मुलाला पंसत होते..तो वडिलांना सांगतोच... की वडिल पहील Pant ची किंमत बगतात..महाग वाटते... आणी मग मुलाला समजुत घालण्यासाठी 'बाळा ती मोठी आहे तुला नाय बसणार आणी असली कपडे लगीच खराब होतात' वगैरे वगैरे कारण सांगुन अखेर स्वस्तातली कपडे घेऊन परिवार दुकाना मधुन घरी जायला निगतो..
बाजारात पाणी-पुरी,आईसक्रीम च्या गाड्या पाहुन मुलांन कडुन पुन्हा एकदा पाणी-पुरी,आईसक्रीम खाण्याचा हट सुरू होतो..काही वेळेस वडिल जानुन-बजुन दुसर्या मार्ग वरून जातात ज्या मार्गात पाणी-पुरी च्या गाड्या नसतात..मुलांची इच्छा मारण्याचा त्यांच हेतु आजीबातच नसतो पण परिसतिथी अस करायला भाग पाडते...
अशी दिवाळीची खरेदी पार पडते..
दर वर्षी हेच होत पण काही वर्षांनी जेव्हा हीच हट करणारी मुल मोठी होतात आणी त्यांना त्यांच्या परिसतिथी ची जानीव होते..तेव्हा दिवाळी च्या एक अठवड्या पुरवी हट करणारी मुल वडील म्हणत नाय तोपर्यत कपडे घ्याची म्हणुन शब्द ही काढत नाय..शेवटी वडील पुन्हा एकदा बाजारात खरेदी करायला येतात..
पुन्हा तोच दुकांनदार आणी दुकांदाराला तेच पहिले शब्द..अर्थात दुकांनदाराला आता ठाऊक झाले असते की ह्यांना किती किंमती ची कपडे दाखवायची..
कपडे चे रेट उंचावले असतात म्हणुन ठोडी माघातली कपडे तो दाखवतो..ह्यावेळेस वडिल नाही मुलच किंमत पाहतात..कपडे आवडलेली तर असतात पण परिसतिथि लक्षात घेत आता मोठी झालेली मुल "बाबा ह्यावेळेस चांगली कपडे नाहीत बाजारत आपण नको घ्याला..येऊ नंतर केव्हा तरी" अस म्हणुन कपडे खरदी चा कार्यक्रम रध करतात...
आणी नेहमी प्रमाणाने आपल्या मुलांची हाऊस पुर्ण न करू शकल्याच दुख ठेऊन तो मनातल्या मनात रदत असतो..त्याच काळजाच पाणी पाणी होत असत..
ह्या वेळेस पाणी-पुरी च्या गाडी कड बगुन तोंडाला सुटेलेल पाण्या कड दुर्लक्ष करत मुल घरी निघुन येतात..केव्हा केव्हा तर पाणी-पुरी च्या गाडी समोरच्या रस्तयाला गर्दी असते सांगुन मुलच वडिलांना दुसर्या मार्गा वरून जाण्यास सांगतात..
शेवटी दर वर्षी प्रमाणे तोच Common Man रात्री झोपताना आपल्या आश्रुंनी डोक्या खालची उशी ओली करत असतो..
येवढ सगळ होऊन सुधा आपल काम/व्यवसाय प्रामाणीक पणे करत दुखांवर हांतरून घालुन सुखी आयुष जगण्याचा तो पर्यंत करतच असतो..
त्याला माझा लाख लाख सलाम..!
©rohitjagtap10rj@gmail.com
No comments:
Post a Comment