"विद्येविना मती गेली,
मतीविना नीति गेली"
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले.
वित्ताविना शुद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले..!!!
----महात्मा फुले
बहुजनांनो शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा...!!
-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
बहुजनांनो आपल्या महापुरषांनी सांगीतल्या प्रमाणे आपल्या आयुष्यात शिक्षण हे फार म्हत्वाच.
आपले पुर्वज शिकले नाही, म्हणुन त्यांच्या वर धर्माच्या नावाने हुकूमशाही करण्यात आली,
बहुजन समाज गुलामगिरीत जगत असल्याच एकच कारण ते म्हणजे अडाणीपणा,
न शिकल्याचा परिणाम.
आज ही आमचा समाजाला तुम्ही किती ही शिक्षित म्हणत असला तरी सुध्दा अजुन अडाणीपणातच वागतो,
आमचा समाज. गुलामगिरीतुन बाहेर पडायलाच नाही म्हणतोय, पण काही प्रमाणात आमच्या लोकांन मधे बदल झालाय.
वाईट व्यवसतेला लाथा मारल्यात त्यांनी पण काही प्रमाणात नाही, परिवर्तन हे पुर्ण समाजाच झाल पाहीजे.
आमच्या बहुजन समाजात शिकुन मोठ्या मोठ्या पदावर गेलेले अनेक आहेत पण शिकुन डिग्री घेऊन काय फायदा जर एखादा
Doctor,Engineer,
Bussinessman,Collector, ईत्या..जर आपल्या हाय-फाय Audi- Mercedes ला 'लिंबू-मिरची' लावलत असल,
जर तो त्याच्या कष्टाने बांधलेल्या बंगल्या वर सत्यनारायणा सारखे लुटारू विधी करत असल,
घराचा दरवाजा कुठल्या दिशेला असावा हे एका भटजी ला विचरत असाल,
कुठल ही काम मुहुर्त पाहुन करत असाल,
आपल्या पोरांच शांती साठी नागबळी-पुजा विधी करत असाल,आणी आजुन बरच काही
फालतू गोष्टी करत असाल तर फायदा काय शिक्षण घेऊन... डिग्र्या घेऊन.????
आजच्या स्पर्धेच्या युगात जर टिकायच असेल,उद्या चा देश हा खरच पुरोगामी बनवायचा असेल तर मित्रांनो शिक्षण फार म्हतवाच आहे.
"शिक्षण हे वाघीणीच दुध आहे, जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही"
अस बाबासाहेब सांगुन गेले..
आपल्याला ते दुध प्यावच लागेल.. जर टिकायच असल तर शिकलच पाहिजे.
ज्या शंभुराजेंनी शिवरायांच्या स्वराज्य आपल्या खांद्यावर उचलून आपल्या पराक्रमाने शत्रुंना सुधा वेड लावल त्या शंभुराजेंनी आपल्या 32 वर्षाच्या आयुष्यात 'बुधभुषणम' हा संस्कृत ग्रंथ तर 'नायिकाभेद','साततशतक', 'नखशिख' हे ब्रज भाषेत ग्रंथ लिहले.
ज्या काळात Google न्हवते Facebook,email,Gmail,Twitter न्हवते.. अहो शाळा ही नव्हत्या त्या वेळेस हे ग्रंथ संस्कृत पंडित शिवपुत्र शंभुराजेंनी लिहल...!!
एक साध्या मछीमार्याच्या घरी जन्मलेला पोरगा..आपल्या शिक्षणा साठी बहीणे चे दागिणे ज्यांला घाण टाकावे लागले.. तोच शिकुण येवढा मोठा माणुस झाला की आज संपुर्ण जग त्यांना 'Missile Man' म्हणुन ओळखत, अशे Dr.APJ Abdul Kalam.
भारतात Super Computer बनुन देणारे एका साध्या शेतकराचं पोर 'विजय भाटकर'
महाराष्ट्राचे जेष्ठ नेते 'डाॅ. श्रीकांत जिचकार' ह्यांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर अनेक पदव्या मिळवल्या आणी त्यांची "The most qualified person in India" म्हणुन Limca Book Of Records मधे नोंद आहे. (अधिक माहीती साठी Google चा वापर करावा)
अशे आजुन कितेक आदर्श आपल्या समोर आसतील.. त्यांचाच आर्दश घेऊन आपण देखील अभ्यासाला लागल पाहीजे.
जो क्षेत्र निवडताल त्या क्षेत्रातला बाप बना.
'ज्या दिवशी बहुजन समाजातला प्रतेक युवक हा उच्च शिक्षीत होईल त्या दिवशीच बहुजन समाज गुलामगिरीतुन मुक्त होईल'
जय जिजाऊ
जय शिवराय
जयस्तु मराठा
✒..रोहीत जगताप पाटील
rohitjagtap10rj@gmail.com
No comments:
Post a Comment